मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि वीज मंत्री तथा मगोपचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांच्यात बुधवारी झालेल्या बैठकीनंतर राज्यात भाजप-मगोप आघाडीच्या विषयावर चर्चा झाली. सुदिन ढवळीकर यांच्यासोबत आगामी विधानसभा निवडणूक आणि आघाडीच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यात भाजपसोबत आघाडी चांगल्या पद्धतीने सुरू आहे. भविष्यात आणखी चांगली होण्यावर भर दिला जात आहे. आपण भाजप-मगोप आघाडीबाबत निर्णय घेऊ शकत नाही. मगोपच्या केंद्रीय समितीने याबाबत निर्णय घेतला पाहिजे. सध्या तरी आगामी निवडणुकीबाबत अजूनपर्यंत कोणताही निर्णय घतलेला नाही, अशी माहिती सुदिन ढवळीकर यांनी दिली.