आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचा काल ज्येष्ठ कॉंग्रेस नेते दिगंबर कामत यांनी दै. ‘नवप्रभा’शी बोलताना साफ इन्कार केला.
दिगंबर कामत हे कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या काल दृकश्राव्य माध्यमांबरोबरच समाज माध्यमांवरही पसरल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर काल दै. ‘नवप्रभा’ने दिगंबर कामत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताचा साफ इन्कार केला.
काही दृकश्राव्य माध्यमांचे प्रतिनिधी आपण भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवा पसरवून आपले नाव बदनाम करू पाहत असल्याचे कामत म्हणाले. आता आपल्या मंत्रिपदाच्या शपथविधीची तारीख तेवढी जाहीर करणे या माध्यमांनी शिल्लक ठेवले असल्याचे नाराजीच्या सूरात कामत म्हणाले.