भाजपच्या नव्या राज्य प्रदेशाध्यक्षाची निवड उद्या रविवार दि. १२ रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी आज शनिवारी दुपारी २ ते ४ या दरम्यान, भाजपच्या पणजीतील कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील, असे पक्षाचे संघटनात्मक निवडणूक प्रभारी गोविंद पर्वतकर यांनी काल पत्रकार परिषदेतून बोलताना सांगितले.
नव्या अध्यक्षांची निवड एकमताने व्हावी अशी पक्षाच्या नेत्यांची इच्छा आहे. मात्र, एकमत होऊ न शकल्यास उद्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणूक झाल्यास नवा अध्यक्ष निवडण्यासाठी एकूण ५२ मतदारांना मतदान करावे लागेल. त्यात ४० राज्य मंडळ सदस्य तसेच दोन खासदार यांच्यासह एकूण ५२ मतदार असतील.
निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना प्रत्येकी १० जणांनी त्यांच्या निवडणूक अर्जावर अनुमोदन द्यावे लागणार आहे. या निवडणुकीला निरीक्षक म्हणून पक्षाचे एक नेते अविनाश राय खन्ना हे हजर असतील.