प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री म्हणून सहा वर्षांचा कार्यकाळ काल पूर्ण केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाल्यानंतर 19 मार्च 2019 रोजी डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 20 जागांसह विजय मिळाल्यानंतर 28 मार्च 2022 रोजी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. गोवा मुक्तीनंतर सर्वाधिक काळ पूर्ण करणारे ते चौथे मुख्यमंत्री आहेत.