भाजप नेत्याकडून भरदिवसा गोळीबार

0
3

भाजपचे माजी आमदार प्रणव सिंह यांनी उत्तराखंडमधील हरिद्वारमधील खानपूर मतदारसंघाचे अपक्ष आमदार उमेश कुमार यांच्या कार्यालयावर रविवारी सुमारे 50 राऊंड गोळीबार केला. माजी आमदार प्रणव सिंह हे तीन वाहनांतून आपल्या समर्थकांसह उमेश कुमार यांच्या कार्यालयाबाहेर पोहोचले. त्यांनी उमेश कुमार यांना बाहेर येण्याचे आव्हान द्यायला सुरुवात केली. ते बाहेर न आल्याने त्यांनी आधी तेथे उपस्थित कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि नंतर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. तसेच कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली. स्वतः प्रणव सिंह यांनी त्याचा व्हिडिओ फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. हल्ल्याच्या वेळी उमेश कुमार कार्यालयातच उपस्थित होते. पोलीस आल्यानंतर उमेशकुमार हे सुरक्षितरित्या कार्यालयातून बाहेर पडले. या घटनेत तीनजण जखमी झाले.