भाजपच्या दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बुधवारच्या बैठकीत दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील उत्तर गोवा मतदारसंघासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तथापि, दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. माजी खासदार नरेंद्र सावईकर, भाजपचे सरचिटणीस दामू नाईक, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांची नावे केंद्रीय समितीकडे पाठविलेली आहेत. केंद्रीय समितीने संभाव्य महिला उमेदवारांची नावे पाठविण्याची सूचना देखील केली होती.