भाजप आमदारांमध्ये असंतोष नाही : मुख्यमंत्री

0
9

राज्यातील भाजप आमदारांमध्ये कुठल्याही प्रकारचे असंतोषाचे वातावरण नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिले.
भाजपचे सर्व मंत्री आणि आमदार एकसंध आहेत. भाजपच्या 12 आमदारांच्या गुप्त बैठकीचे वृत्त तथ्यहीन आहे. काही जणांकडून केवळ अफवा पसरविण्याचे काम केले जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करण्यासाठी भाजपच्या 12 आमदारांनी गुप्त बैठक घेऊन ते अज्ञातस्थळी रवाना झाल्याचे वृत्त गुरुवारी समोर आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.