भाजपा प्रदेशाध्यक्षांची निवड लवकरच

0
123

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी भाजपच्या गाभा समिती, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत घेतलेल्या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षाच्या नावावर काल प्राथमिक चर्चा काल केली. माजी आमदार दामू नाईक, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांची नावे अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. भाजपच्या नूतन प्रदेशाध्यक्षाची निवड येत्या आठ ते दहा दिवसात केली जाणार आहे. राष्ट्रीय पदाधिकार्‍यांकडून भाजपच्या गोव्यातील नेत्यांशी प्रदेशाध्यक्षाच्या नावावर चर्चा करून अहवाल केंद्रीय समितीकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर केंद्रीय समितीकडून प्रदेशाध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.