पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर दगड आणि विटांनी हल्ला करण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये दोन्ही नेते कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी चालले असता ताफ्यातील त्यांच्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला.
नड्डा यांच्या ताफ्यातील वाहनांवर तुफान दगडफेक करण्यात आल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. २०२१ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नड्डा कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेले होते.
विजयवर्गीय यांच्याही ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. विजयवर्गीय यांनी कारमधून प्रवास करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विजयवर्गीय यांचा ताफा जात असताना रस्त्यावर निषेध करत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी होत असून याचे दिसत आहे. तसेच दगडफेक करत गाडीच्या काचाही फोडल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.