भाजपला १३५ जागा देण्यास शिवसेनेचा नकार

0
86

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला १३५ जागा देण्यास शिवसेनेने काल पुन्हा एकदा स्पष्ट नका दर्शवला. पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी युती तोडून एकट्याने निवडणूक लढण्याचीही तयारी ठेवली असल्याचे बोलून दाखवले. महाराष्ट्रात गेली २५ वर्षे सेना-भाजप युती असून २००९ च्या निवडणुकीत २८८ सदस्यीय विधानसभेत सेनेने १६९ तर भाजपने ११९ जागा लढवल्या होत्या.
रविवारी भाजप प्रवक्ते राजीव प्रताप रुढी यांनी म्हटले होते की महायुतीतील रिपाई व स्वाभिमानी संघटनेला १८ जागा देऊन भाजप-सेनेनेे प्रत्येकी १३५ जागा लढवाव्यात. यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटले की तसे असेल तर मग बाळासाहेब ठाकरे यांनी ठरवलेल्या जागावाटपाप्रमाणे सेनेने १७१ व भाजपने ११७ जागा लढवाव्यात.