आम आदमी पार्टी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देणार नाही, अशी माहिती आपचे बाणावलीतील नवनिर्वाचित आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. भाजपला सरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ प्राप्त झाले आहे.
आमची भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची इच्छा नाही, असे व्हिएगस यांनी सांगितले. दरम्यान, गोव्यातील प्रामाणिक राजकारणाची सुरुवात झाली आहे, असे आपचे राष्ट्रीय समन्वयक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.