‘भाजपच्या घोषणेनंतरच काँग्रेसचे उमेदवार जाहीर’

0
4

राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतरच काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. भाजपला खोडा घालणे किंवा शेवटच्या क्षणी रणनीती बदलण्याची सवय आहे. त्यामुळे भाजपच्या घोषणेनंतरच काँग्रेस उमेदवारांची नावे जाहीर करण्याची रणनीती अवलंबिण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. त्यांना निवडणुकीचे काम सुरू करण्याची सूचना केली आहे, असेही पाटकर यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्ष पक्षांतर करणाऱ्यांना थारा देत नाही. पक्षांतराच्या विरोधात लढा देत आहे. काँग्रेसने पक्षांतर केलेल्या कुठल्याही नेत्याला प्रवेश दिलेला नाही, असेही अमित पाटकर यांनी सांगितले.