आपल्यासह भाजपच्या अर्ध्या आमदारांना येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याचे भाजपचे आमदार व बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, भाजपच्या विद्यमान आमदारांपैकी सर्वांनाच उमेदवारी मिळेल असे नाही असे काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर लोबो बोलत होते. त्यांनी पुढे, खरे तर माझीही उमेदवारी धोक्यात असून मला दुसर्या पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवावी लागेल. मात्र कुठल्या पक्षाच्या उमेदवारीवर ते मतदारच ठरवतील असे सांगितले. लोबोंच्या या विधानामुळे पुन्हा एकदा भाजपच्या आमदारांमध्ये खळबळ माजली आहे.