भाजपचे नगरसेवक शुभम चोडणकर यांची पणजीचे महापौर तर बाबूश गटाचे नगरसेवक ऍडवर्ड जॉर्ज यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे पणजी महापालिका आयुक्त संजीत रॉड्रिग्स यांनी काल अधिकृतपणे जाहीर केले. वरील दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने दोन्ही नगरसेवकांची महापौर व उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे रॉड्रिग्स यांनी स्पष्ट केले. भाजप व बाबूश मोन्सेर्रात गटांत वरील दोन्ही पदांसाठी समझोता झाल्याने दोन्ही पदांवर शुभम चोडणकर व ऍडवर्ड जॉर्ज यांची बिनविरोध निवड झाली. चोडणकर हे आज शनिवारी सकाळी १० वाजता आपल्या पदाचा ताबा स्वीकारणार आहेत, तर उपमहापौर ऍडवर्ड जॉर्ज यांनी कालच आपल्या पदाचा ताबा घेतला.