भाजपमधील नाराज नेते आणि कार्यकर्त्यांना गोवा सुरक्षा मंचाचे दरवाजे खुले आहेत. गोसुमंमध्ये प्रवेशासाठी कुठल्याही प्रकारचे बंधन नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी गोवा संघचालक तथा गोवा सुरक्षा मंचाचे मार्गदर्शक सुभाष वेलिंगकर यांनी काल व्यक्त केले. कॉंग्रेसच्या दोन आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते व निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व इतरांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे.