>> सरकारच्या कारभाराविषयी जनतेत संताप
सत्ताधारी भाजपने सर्वच बाबतीत गोमंतकीय जनतेचा विश्वासघात केलेला असून, कोविड काळातही राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे राज्यातील शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे भाजपचा पराभव अटळ आहे, असा दावा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
भाजप सरकारच्या गैरकारभारामुळे गोव्यातील जनता त्रस्त झाली आहे. प्रत्येक क्षेत्रात बजबजपुरी माजली आहे. त्यामुळे जनता त्रस्त झालेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनता भाजपविषयी संताप व्यक्त करताना दिसत असून, या अपयशी भाजप सरकारला राज्यातील जनता पुन्हा सत्तेवर आणणार नाही, असे पटोले म्हणाले.
भाजपनेच राज्यातील खाण उद्योग बंद पाडला होता, याची आठवणही पटोले यांनी यावेळी करून दिली. पणजीची जागाही कॉंग्रेसच जिंकणार आहे. उदय मडकईकर हे कॉंग्रेससाठी काम करीत असून, शेजारच्या मतदारसंघातही ते कॉंग्रेसला मदत करणार आहेत, असेही ते म्हणाले.
कोविडच्या दुसर्या लाटेच्यावेळी रुग्णांचे प्राण वाचवण्याच्या कामी सरकारला पूर्ण अपयश आले. कोविड रुग्णांना प्राणवायू पुरवण्यास सरकारला अपयश आल्याने शेकडो रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. ही बाब लोक विसरलेले नसून, यंदाच्या निवडणुकीत ते भाजपचा पराभव करणार आहेत.
- नाना पटोले,
प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र कॉंग्रेस.