लोकसभा निवडणुकीमुळे सध्या राजकीय हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. सर्व पक्षांकडून लोकसभेच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत असून, या निवडणुकीसाठी भाजपने अर्थात एनडीएने ‘अबकी बार 400 पार’ चा नारा दिला आहे. भाजपने आतापर्यंत उमेदवारांच्या पाच याद्या जाहीर केल्या असून, 400 हून अधिक उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने देशातील सुमारे 90 टक्के उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महत्त्वाचे म्हणजे भाजपने 100 विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारली आहे.
मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एनडीएचे 400 पारचे लक्ष्य आहे. 100 विद्यमान खासदारांची पुन्हा निवडून येण्याबाबत साशंकता असल्याने भाजपने खासदारांना दुसरी संधीच दिलेली नाही. त्यामुळे भाजपच्या 100 खासदारांना मोठा दणका बसला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत 402 उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. आगामी निवडणुकीत भाजप 440 ते 450 जागांवर उमेदवार मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.
‘400 पार’साठी भाजपची रणनीती
भाजपने मित्रपक्ष वगळता स्वत:च्या बळावर 370 जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे, तर मित्रपक्षांसोबत 400 हून अधिक जागांवर विजय मिळवण्याची भाजपला अपेक्षा आहे.
भाजपने स्वत:चे 400 हून अधिक जागांवरील उमेदवार जाहीर केले असून, इतर उमेदवारांची घोषणाही लवकरच हेोईल.