कालच्या जिल्हा पंचायत निवडणूक निकालांत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी ठरले असले तरी केवळ हाती असलेल्या सत्तेचा दुरुपयोग करूनच भाजपने हा विजय संपादन केला असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील भाजप सरकारची हुकूमशाही संपवण्यासाठी आपला पक्ष जनतेचा विश्वास संपादन करील असे ते म्हणाले. कॉंग्रेसचे कित्येक आमदार भाजपच्या गोटात गेलेले असल्यानेच मतदारांनी कॉंग्रेसला मते न देता भाजपला मते देणे पसंत केले असावे असे चोडणकर म्हणाले.