गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आज त्यांच्या पुण्यतिथीदिनी गोवा विधानसभा संकुलात होणार आहे. सकाळी ९.३० वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर या पुतळ्याचे अनावरण करतील. सकाळी ८.३० वाजता मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी मिरामार येथील भाऊसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर जुन्या सचिवालयातील भाऊसाहेबांच्या पुतळ्याला सकाळी ९ वाजता पुष्पहार अर्पण करतील व त्यानंतर पर्वरीतील सचिवालय संकुलात हा सोहळा होणार आहे.