काल सायंकाळी चंद्रावाडो-फातोर्डा येथे भंगारअड्ड्यात स्फोट होऊन त्यात दोन कामगार भाजून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा इस्पितळात दाखल केले आहे. इर्शाद यांच्या मालकीच्या भंगारअड्ड्यात भवनसिंग (53, रा. बिहार) व उज्वल प्रसाद (45, रा. उत्तर प्रदेश) हे दोघे भंगारअड्ड्यात गॅसने पत्रे कापत होते. त्यावेळी आग लागून स्फोट झाला आणि त्यात ते दोघे भाजले.