मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हक्काचा टॅक्सी स्टँड मिळावा, यासाठी मागच्या वर्षापासून स्थानिक टॅक्सी व्यावसायिक वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करत होते. हा विमानतळ सुरू झाल्यानंतर अखेर एका वर्षाने या भूमिपुत्रांना ब्ल्यू टॅक्सी स्टँड मंजूर झाला असून, तो 1 डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिली.