ब्रिटिश महिलेवर हरमल येथे बलात्कार

0
14

>> संशयितास अटक; पेडणे पोलिसांकडून गुन्हा नोंद

हरमल येथील किनार्‍यालगत गोड्या पाण्याच्या तळ्याजवळ एका ब्रिटिश महिलेचा ३२ वर्षीय इसमाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी संशयितास सोमवारी अटक केली. जोयल विन्सेंट डिसोझा असे या संशयिताचे नाव आहे.

पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ब्रिटिश महिला २ जून रोजी हरमल येथील गोड्या पाण्याच्या तळ्याच्या परिसरात पर्यटनाचा आनंद लुटत होती. यावेळी सकाळी ११च्या सुमारास हरमल येथील जोएल डिसोझा हा तेथे दाखल झाला व त्याने सदर ब्रिटिश महिलेचा लैंगिक छळ केला. तसेच संशयिताने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार नोंदवल्यानंतर पेडणे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या ३७६ कलमाखाली गुन्हा नोंद केला. त्यानंतर सोमवारी कारवाई करत संशयितास अटक केली.