ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रूस यांचा राजीनामा

0
6

ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा सत्तानाट्य सुरू झाले असून पंतप्रधान बनल्यानंतर केवळ ४५ दिवसांत लिझ ट्रूस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लिझ ट्रूझ यांनीच पत्रकार परिषदेत तशी घोषणा केली. पक्षांतर्गत बंडखोरांचा आवाज तीव्र झाला असून ट्रूस यांच्याविरोधात पक्षाचे १०० सदस्य लवकरच अविश्वास प्रस्ताव आणण्याची शक्यता होती. मात्र त्या अगोदरच ट्र्‌स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, नव्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांचा दावा अधिक भक्कम झाला आहे.