ब्रिटनच्या पंतप्रधानपदी कीर स्टार्मर

0
10

>> ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव

ब्रिटनमध्ये सत्तांतर घडून येताना भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव झाला आहे. सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाला दणदणीत विजय मिळाला आहे. पक्षाने 650 जागांपैकी 412 जागा जिंकल्या.
सरकार स्थापन करण्यासाठी 326 जागांची आवश्यकता आहे. दुसरीकडे, हुजूर पक्षाच्या 120 जागा कमी झाल्या असून हुजूर पक्षाचा गेल्या 200 वर्षांतील हा सर्वात मोठा पराभव आहे. सध्या हुजूर पक्षाचे नेतृत्व सुनक यांच्याकडे, तर मजूर पक्षाची धुरा एप्रिल 2020 पासून कीर स्टार्मर यांच्याकडे आहे. स्टार्मर यांनी या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवले आहे. पराभव झाल्यानंतर काही तासांनी ऋषी सुनक यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. मजूर पक्षाचे 61 वर्षीय कीर स्टार्मर हे देशाचे 58 वे पंतप्रधान बनले आहेत.