ब्राह्मीदेवी यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

0
24

श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर तथा आध्यात्मिक धर्मगुरु, पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य मार्गदर्शनाने इंटनॅशनल सद्गुरू फाउंडेशन तथा जगत जननी या संस्थांच्या माध्यमातून महिला वेदविदूषी, महिला पौरोहित्य, महिला संस्कार शिबिर, महिला सशक्तीकरण, स्त्री संघटन अशा विविध कार्यक्रम व उपक्रमांच्या माध्यमातून महिलांसाठी कार्य करीत असताना ऍड. ब्राह्मीदेवी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करीत असतात. अशा या महिलांसाठी केलेल्या कार्याच्या नेतृत्वाची दखल पुणे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी धर्मपीठ या संस्थेने घेऊन ऍड. ब्राह्मीदेवीजींना महिला सशक्तिकरणासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार २०२२ हा पुरस्कार प्रदान करुन गौरवान्वित केले. सदर पुरस्कार प्रदान सोहळा आचार्य अत्रे रंग मंदिर, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी व्यासपीठावर शांताअक्का कुमारी – संचालिका राष्ट्रसेविका समिती, उषा सिंह ठाकूर – सांस्कृती, धार्मिक व पर्यटन मंत्री मध्यप्रदेश, सरिता राजठाकूर – सचिवा देवी अहिल्या मंदिर नागपूर आदी मान्यवर उपस्थित होते.