ब्रह्मेशानंदाचार्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान

0
22

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारद्वारे गोव्याच्या आध्यात्मिक क्षेत्रात धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींना पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला होता.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सदर पुरस्कार स्वामींना राष्ट्रपती भवन, दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.

श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रपतींनी पीठाधीश्‍वर सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींना पद्मश्री पुरस्कार बहाल केला आहे. ही गोव्याच्या तसेच संप्रदायाच्या इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिण्याची बाब आहे, असे श्री दत्त पद्मनाभ पीठाने म्हटले आहे.

या सोहळ्यास उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू, देशाच्या प्रथम महिला सविता कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत् प्रकाश नड्डा तसेच विविध प्रतिष्ठित मान्यवरांसह श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या संचालिका ऍड. ब्राह्मीदेवी, श्रीराज शेलार, महाप्रबंधक शुभक्षण नाईक, कृपाकांक्षी शशिकांत केरकर, उद्योजक रमेश फडते, विश्वजीत गावस आदी मान्यवर उपस्थित होते.