बोस, टागोरांचे स्वप्न साकार करू ः शहा

0
211

>> गृहमंत्र्यांचा पश्‍चिम बंगालात रोड शो

बंगालच्या जनतेला आता राजकीय हिंसाचार, भ्रष्टाचार, बांगलादेशी घुसखोर, खंडणी, टोल लूटपासून स्वातंत्र्य हवे आहे. जनतेने भाजपला फक्त एक संधी द्यावी. आम्ही शोनार बांग्ला बनवू आणि पश्चिम बंगालचे टागोर आणि सुभाषचंद्र बोस यांचे स्वप्न साकार करू, असे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी सांगितले. पश्चिम बंगालच्या बीरभूममधील बोलपूरमध्ये अमित शहा यांच्या रोड शो आयोजित केला होता. त्यावेळी श्री. शहा बोलत होते.

या रोड शोला भाजप समर्थकांची मोठी गर्दी उसळली होती. ही गर्दीपाहून शहायांनी, आतापर्यंत अनेक रोड शो आणि जाहीरसभा बघितल्या. पण आयुष्यात असा रोड शो बघितला नाही. पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी जनता तळमळत असल्याचे सांगितले.
अमित शहा यांनी २ किमीपर्यंत रोड शो केला. या रोड शोमधील समर्थकांना अमित शहांनी संबोधित केले. रोड शोमध्ये उसळलेली ही गर्दी म्हणजे ममता सरकारविरोधात जनतेत असलेला रोष दर्शवते आणि विकासाच्या अजेंड्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील जनतेचा विश्वास दिसून येत असल्याचे शहा म्हणाले.

आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मत द्या. आम्ही बंगालला विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ. रविंद्रनाथ टागोर आणि सुभाषबाबूंच्या स्वप्नातील बंगाल बनवू. ज्या राज्यात भाजपाची सत्ता आहेत तिथे ती राज्य विकासाच्या मार्गावर आहेत. पण पश्चिम बंगाल विकासाच्या मार्गावरून भरकटले असल्याचे शहा म्हणाले.