बोडो, प्रेमजीत ओडिशा एफसी संघात

0
104

>> कोरोना महामारीचा आणखी एक फटका

कोरोना महामारीमुळे संपूर्ण क्रीडा जगत स्तब्ध झालेले आहे. क्रिकेट जगतालाही त्याचा मोठा फटका बसला आहे. या महामारीमुळे बर्‍याच स्पर्धा-मालिका रद्द वा स्थगित होत आहेत. त्यात आता आणखी एका क्रिकेट मालिकेचा समावेश झाला आहे. कोरोनाच्या धास्तीने भारतीय संघाचा या महिन्याच्या अखेरीस होणारा श्रीलंका दौरा स्थगित करावा लागला आहे.

टीम इंडिया या जून महिन्याच्या शेवटी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेच्या दौर्‍यावर जाणार होती. परंतु हा दौरा आता रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. देशात सध्या कोरोनाचा प्रभाव वाढला असून त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तीन वनडे आणि ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया या महिनाअखेरीस दौर्‍यावर येऊ शकणार नसल्याचे श्रीलंका क्रिकेटला कळविल्याचे वृत्त आहे. टीम इंडिया २४ जून ते ११ जुलै दरम्यान श्रीलंकेत एकदिवसीय आणि टी -२० मालिका खेळणार होती. हा दौरा स्थगित झाल्याने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला मोठा फटका बसणार आहे. २३ जुलै रोजी बांगलादेश देखील श्रीलंका दौर्‍यावर जाणार आहे, पण कोरोना विषाणूमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मात्र टीम इंडियाला श्रीलंकेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेने आम्ही सुरक्षित पद्धतीने भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांचे आयोजन करू असे सांगितले होते.

असे असले तरी भारतीय संघाला लंकेने ऑगस्टमध्ये दौर्‍यासाठी आमंत्रण दिलेले आहे. त्याला सकारात्मक प्रतिसादही मिळालेला आहे. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट ऑगस्टमध्ये भारताविरुद्धच्या मालिकेसाठी अजूनही आशावादी आहे.