गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा शाखेने बोगस कॉल सेंटर चालवून लोकांना लुबाडणार्या एका टोळीच्या जुने गोवे येथे काल मुसक्या आवळल्या. या प्रकरणी १६ जणांना अटक करण्यात आली असून, त्यात ८ युवतींचा समावेश आहे. पोलिसांनी या टोळीकडून १४ लॅपटॉप, ८ मोबाईल फोन व इतर वस्तू हस्तगत केल्या आहेत.
सायबर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक केली जात होती. पोलिसांनी केलेल्या तपासात महंमद ऊर्फ रॉय फर्नांडिस (३२, रा. गुजरात) हा बोगस कॉल सेंटर प्रकरणातील सूत्रधार असल्याचे उघडकीस आले आहे.