इंडियन मुजाहिदीनच्या अटकेत असलेल्या संशयित आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरुन काल कर्नाटक पोलिसांना चौथ्या संशयिताला अटक केली. त्याच्याजवळील स्फोटकेही ताब्यात घेण्यात आली आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये बंगळुरुतील चर्चनजीक झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी केंद्रीय क्राईम ब्रँचने इंडियन मुजाहिदीनच्या तीन संशयितांना अटक केली होती. वरील बॉम्बस्फोटात एक महिला ठार झाली होती.