बेळगावहून महाराष्ट्राच्या विविध भागांत जाणार्या कर्नाटक परिवहन मंडळाच्या बससेवा स्थगित ठेवण्याचा निर्णय काल घेण्यात आला.
यळ्ळूर गावात मराठी भाषकांनी उभारलेला फलक कर्नाटक प्रशासनाने मोडून टाकल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरमध्ये कर्नाटक राज्याच्या वाहनांवर दगडफेकीचे प्रकार घडले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणारी सर्व वाहने सीमेवर तपासण्याचे काम चालू होते. सध्या संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात सुरक्षेच्या कारणास्तव निर्बंध आदेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, बससेवा स्थगितीसंबंधी आज आढावा बैठक होणार आहे. बेळगावहून कोल्हापुर, पुणे, महाबळेश्वर, मुंबई व इतर ठिकाणी बससेवा चालू होत्या.