बेनिवाल यांना हटविण्यामागे राजकीय सूड नाही : सरकार

0
91

मिझोरमच्या राज्यपाल कमला बेनिवाल यांना पदच्यूत करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयास राजकीय सूड असे संबोधून काल विरोधकांनी टीका केली. सरकारने मात्र हे आरोप फेटाळून आपल्या कृतीचे समर्थन केले. गुजरातच्या माजी राज्यपाल ८७ वर्षीय बेनिवाल यांना त्यांच्या कार्यकाळ संपायच्या दोन महिने आधी काढून टाकण्याचा आदेश काल जारी केला होता. बेनिवाल यांचे नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी अनेकदा खटके उडाले होते.गेल्या महिन्यात बेनिवाल यांना गुजरातहून मिझोरमला पाठवले होते. दरम्यान, गेल्या महिन्यात पदच्यूत केलेले पुडुचेरीचे राज्यपाल कॉंग्रेस नेते विरेंद्र कटारिया यांनीही या निर्णयाला राजकीय सूड संबोधून संविधानाचे हनन म्हटले. सर्व आरोप फेटाळताना संसदीय व्यवहार मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले की, राज्यपालांना घटनेच्या चौकटीतच हटविले आहे, तो सरकारचा विशेषाधिकार असून राष्ट्रपतींनी पूर्ण विचारांती निर्णय घेतला आहे. काही गंभीर आरोप होते ज्याची दखल घेऊन सरकारने कारवाई केली आहे. राजकारण सरकारने नव्हे तर विरोधक करत आहेत त्याला म्हणतात असे नायडू म्हणाले.