बेतोड्यातील अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

0
2

बेतोडा येथे टेम्पोची धडक बसून एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू होण्याची घटना बुधवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. तुकाराम रामा जांगले (50, रा. बोणबाग) असे मृत इसमाचे नाव आहे. या अपघात प्रकरणी महंमद हसन बेळगावकर (40, रा. तिस्क उसगाव) या टेम्पोचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महंमद हसन बेळगावकर हा चालक आपल्या टेम्पो (क्र. जीए-03-के-6422) ने कुर्टी येथून मडगाव येथे जात होता. बेतोडा येथील जंक्शनजवळ रस्त्याच्या बाजूने चालत जाणाऱ्या तुकाराम जांगले यांना टेम्पोची धडक बसली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात सापडलेल्या टेम्पो चालकाला ताब्यात घेत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.