काल बुधवारी सायंकाळी बेतूल येथे साळ नदीत तिसऱ्यो काढण्यासाठी गेलेली तीन मुले पाण्यात वाहत जावून गटांगळ्या खाऊन बुडत असताना किनाऱ्यावरील जीवरक्षक व इतर उपस्थित लोकांनी पाण्यात उड्या मारून दोघांना सुखरूप पाण्याबाहेर काढले. मात्र त्यातील एक बेपत्ता आहे. काल सायंकाळी बेतूल येथे साईराज जोशी (11), अर्वा वाडेकर (10), साईराज सावंत हे तिघे तिसऱ्या काढायला गेले होते. काही वेळानंतर ती मुले पाण्यात खेळू लागली. खेळत असताना अचानक लाट आल्याने लाटांबरोबर खोल पाण्यात ती मुले गटांगळ्या खाऊ लागली. हे पाहून किनाऱ्यावरील रक्षकांनी उड्या मारून साईराज सावंत व अर्वा वाडेकर यांना सुखरूप पाण्याबाहेर काढल्याने ती बचावली, पण साईराज जोशी मात्र अद्याप सापडला नाही.