गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने पर्वरी येथील एका व्हिलावर छापा घालून आयपीएल क्रिकेट बेटिंग घेत असल्याप्रकरणी एका टोळीतील 16 जणांना अटक केली. त्यात गुजरातमधील 15 आणि उत्तर प्रदेशातील एकाचा समावेश आहे. अटक केल्यानंतर संशयितांकडून पोलिसांनी 46 मोबाईल फोन, 9 लॅपटॉप आणि रोख रक्कम मिळून 15 लाख 12 हजारांचा ऐवज जप्त केला.