कुळे येथे बेकायदेशीर खनिज उत्खनन केल्या प्रकरणी काल गोवा पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाने प्रफुल्ल हेदे यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद केले. हेदे यांच्याबरोबरच इतरही काही सरकारी अधिकार्यांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. १९९८ ते २००७ या दरम्यान कुळे येथे हेदे यांनी बेकायदेशीररित्या खनिज उत्खनन केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.