बेंगळुरूमध्ये काँग्रेसने बोलावली 17,18 रोजी विरोधकांची बैठक

0
7

काँग्रेसने 17 आणि 18 जुलै रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथे विरोधी पक्षांची दुसरी बैठक बोलावली आहे. यावेळी सभेसाठी 8 नवीन पक्षांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीत 24 राजकीय पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. 17 जुलै रोजी सोनिया गांधी सर्व पक्षांच्या नेत्यांसाठी डिनर आयोजित करणार आहेत.
काँग्रेसने आपचे अरविंद केजरीवाल यांनाही फोन केला आहे. पाटणा बैठकीनंतर दिल्ली अध्यादेशाच्या मुद्द्यावर काँग्रेसने मौन धारण केल्यामुळे ‘आप’ने दुसऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला होता.

सोनिया, राहुल उपस्थित राहणार
सोनिया गांधी बंगळुरू येथे होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधीही उपस्थित राहणार आहेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही सोनियांच्या सहभागाचा दावा केला आहे. पाटणा सभेला फक्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल उपस्थित होते.
विरोधी पक्षाच्या बैठकीत सहभागी झालेल्या 8 पक्षांत मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम, कोंगू देसा मक्कल कच्ची, विदुथलाई चिरुथाईगल काची, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, इंडियन युनियन मुस्लिम लीग, केरळ काँग्रेस (जोसेफ) आणि केरळ काँग्रेस (मणी) यांचा सहभाग आहे.