‘बीच वेडिंग’साठीचे वाढीव शुल्क रद्द

0
7

गोवा हे समुद्रकिनाऱ्यांवर होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी देशातीलच नव्हे, तर जगातीलही पहिल्या क्रमांकाच्या पसंतीचे स्थळ ठरल्यानंतर राज्य सरकारने ‘बीच वेडिंग’साठी दिवसाला एक लाख रुपये असे वाढवलेले शुल्क मागे घेतले असून, आता पूर्वीप्रमाणेच पाच दिवसांच्या पूर्ण पॅकेजसाठी एक लाख रुपये एवढेच शुल्क पूर्वीप्रमाणे आकारण्यात येणार आहे. मात्र, पाच दिवसानंतर प्रतिदिन 10 हजार रुपये एवढे शुल्क आकारण्यात येणार आहे. समुद्रकिनाऱ्यांवर विवाह सोहळ्यासाठी तसेच इतर कार्यक्रम करण्यासाठी पाच दिवसांसाठी एक लाख रुपये एवढे शुल्क आकारण्यात येत असे; मात्र काही दिवसांपूर्वी सरकारने शुल्कात बदल करून पाच दिवसांऐवजी केवळ एका दिवसासाठी 1 लाख रुपये असे शुल्क वाढवले होते. मात्र, टीटीएजीचे अध्यक्ष जॅक मखिजा यांनी ही एवढी शुल्कवाढ योग्य नसून, ती मागे घेण्याची मागणी केली होती. दुसऱ्या बाजूला किनारी भागातील घरे आणि इतर बांधकामांसाठी आराखडा बदलायचा असल्यास मुळ शुल्काच्या 10 टक्के अतिरिक्त शुल्क आता आकारण्यात येणार आहे. मात्र, त्यात बदल केलेला नाही, असे पर्यावरण खात्याचे संचालक जॉन्सन फर्नांडिस यांनी सांगितले. घराची दुरुस्ती अथवा नूतनीकरणासाठी 25 हजार रुपये एवढे शुल्क आहे.