बीएलओ बदलीच्या आदेशाला स्थगिती

0
5

पणजी मतदारसंघातील 28 अधिकाऱ्यांची केली होती बदली

पणजीत मतदारसंघातील 30 पैकी 28 मतदान केंद्र अधिकाऱ्याच्या (बीएलओ) बदलीच्या आदेशाला अखेर स्थगिती काल देण्यात आली आहे.
पणजी मतदारसंघातील 30पैकी 28 बीएलओंच्या बदलीचा आदेश 17 एप्रिल 2025 रोजी जारी करण्यात आला होता. पणजीतील नवीन 28 बीएलओ नियुक्तीचा विषय बराच गाजत आहे. मतदारयाद्यांमध्ये परप्रांतीयांची नावे समाविष्ट करण्यासाठी राजकीय नेत्याच्या मर्जीतील व्यक्तींची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

केवळ पणजी मतदारसंघातीलच 28 बीएलओंची बदली करण्यात आली आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. माजी सनदी अधिकारी, सिटीझन्स फॉर डेमोक्रेसीचे एल्वीस गोम्स यांनी 14 मे 2025 रोजी या बीएलओ बदली प्रकरणी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, उत्पल पर्रीकर व इतरांनी नवीन बीएलओ नियुक्तीला विरोध केला होता. गोम्स यांच्याकडून बीएलओ बदलीचा विषयाच्या पाठपुरावा केला जात होता. तरी, निवडणूक अधिकाऱ्यांकडून याबाबत कारवाई केली जात नव्हती. अखेर, एल्विस गोम्स यांनी 11 जून 2025 रोजी एक पत्रकार परिषदेत घेऊन या विषयाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने उत्तर गोवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता.
त्यामुळे नवीन बीएलओ नियुक्ती स्थगित ठेवणारा आदेश पणजी मतदारसंघ नोंदणी अधिकारी तथा तिसवाडीचे उपजिल्हाधिकारी राजेश आजगांवकर यांनी काल जारी केला.