बिहारमध्ये बंडखोरी केल्याने भाजपचे नऊ नेते निलंबित

0
90

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी याद्या जाहीर केल्या. यावेळी भाजपमध्ये बंडखोरी उफाळून आली असून नऊजणांनी एनडीएच्या विरोधात बंड केल्याने त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपासोबत जदयू आणि इतर दोन छोटे पक्ष एनडीएतून निवडणूक लढवत आहेत. मात्र, एनडीएतील जागावाटपात अनेक जागा जदयू व मित्रपक्षांकडे गेल्याने भाजपातील इच्छुक नेते नाराज झाले. या नेत्यांनी बंडखोरी केली असून, एनडीए उमेदवारांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत भाजपाने नऊ बंडखोर नेत्यांवर कारवाई केली आहे. नऊ नेत्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी पक्षातील नेत्यांना इशारा दिला होता.