बिहारमध्ये आरक्षणाची व्याप्ती 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

0
13

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. बिहारमधील आरक्षणाची व्याप्ती 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. नितीश कुमार यांच्या या राजकीय खेळीमुळे त्यांनी भाजपवर मात केल्याची चर्चा आहे. मागास आणि अतिमागास जात जनगणना सर्वेक्षणासह एससी आणि एसटी लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार आरक्षण वाढवण्याची गरज आहे. सध्या आरक्षण 50 टक्क्यांवरून 65 टक्के केले पाहिजे. प्रगत जातींमधील आर्थिकदृष्ट्‌‍या दुर्बल घटकांसाठी आधीच 10 टक्के आरक्षण आहे. त्यामुळे या 65 टक्क्यांनंतर एकूण आरक्षण 75 टक्के होईल, असे बिहार विधानसभेत नितीश कुमार म्हणाले.