बिबट्यांची संख्या 10 टक्क्यांनी घटली

0
14

गोव्याच्या जंगलातील बिबट्यांची संख्या मागील 4 वर्षांत 10 टक्क्यांनी कमी झाली आहे, असे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा वार्षिक अहवाल जाहीर करण्यात आला आहे. गोव्यातील जंगलामध्ये वर्ष 2022 मध्ये 77 बिबट्यांची नोंद झाली, तर त्या आधी गोव्यात वर्ष 2018 मध्ये 86 बिबट्यांची नोंद झाली होती. वर्ष 2018 ते 2022 या चार वर्षांत गोव्यातील बिबट्यांची संख्या 9 ने घटली आहे.