बाळा मापारी यांचे स्मारकरूपी घर बांधणार

0
3

>> हेल्पलाईन सेंटर, सायबर योद्धा, क्वीक पास व ए-आय लॅबचा समावेश

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

गोवा पोलिसांच्या स्वतंत्र सायबर हेल्पलाइन सेंटर (1930), सायबर-योद्धा कार्यक्रम, ए-आय-एमएल लॅब आणि क्विक पास मोबाईल ॲप्लिकेशन अशा चार उपक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल करण्यात आला आहे.
गोवा पोलिसांनी रहदारीचे अनुपालन वाढविण्यासाठी आणि वाहनचालकांची गैरसोय कमी करण्यासाठी क्वीक पास मोबाईल ॲप्लिकेशन सादर केले. या अंतर्गत चालकांना अनुपालनाचा पुरावा म्हणून क्यूआर कोड तयार करण्यास मान्यता दिली जाणार आहे. वाहतूक चेकपॉईंट्सवर वारंवार कागदपत्र पडताळणी करण्याची आवश्यकता राहणार नाही. एकदा क्यूआर कोड जारी केल्यानंतर, प्रवाशाकडून कोणतेही दृश्यमान उल्लंघन होईपर्यंत तो 12 तासांसाठी वैध असणार आहे.

सायबर-योद्धा
सायबर योद्धा कार्यक्रम हा सायबर सुरक्षा गोवा मोहिमेअंतर्गत एक अनोखा उपक्रम असून या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात सायबर जागरूकता दूत तयार केले जाणार आहेत. राज्यातील विद्यार्थी, व्यावसायिक, शिक्षक, एनजीओ आणि ज्येष्ठ नागरिक यांना या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन सायबर जागरूकता कार्यात सामावून घेतले जाणार आहेत.

ए-आय लॅब
कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगची वाढती भूमिका ओळखून, गोवा पोलिसांनी समृद्ध भारत टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने गुन्हे शाखा, रायबंदर येथे ए आय लॅबची स्थापना केली आहे. ही लॅब सायबर सुरक्षा वाढवण्यासाठी ए-आयचालित प्रकल्प विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. ए-आय -सक्षम हेल्प डेस्क, दुर्भावनापूर्ण सामग्री ओळखण्यासाठी आणि ब्लॉक करण्यासाठी एआय टूल्स आणि मशीन लँग्वेज वापर गुन्हेगारी ओळखण्यासाठी वापर केला जाणार आहे.

सायबर गुन्हा हेल्पलाईन
गोवा पोलिसांनी 1930 सायबर गुन्हा हेल्पलाइनचे नूतनीकरण केले आहे. पणजी येथे कार्यरत असलेली सायबर गुन्हा हेल्पलाईन रायबंदर येथे पोलीस स्थानकामध्ये हलवण्यात आली आहे. सायबर फसवणूक आणि ऑनलाइन गुन्ह्यांच्या तक्रारींमध्ये नागरिकांना मदत करण्यासाठी दोन समर्पित फोन लाइन चोवीस तास कार्यरत करण्यात आल्या आहेत. तसेच, नऊ कर्मचाऱ्यांचे पथक तीन पाळ्यांमध्ये काम करणार आहे. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलमध्ये तक्रारी त्वरित नोंदवण्यासाठी प्रत्येक ऑपरेटर स्वतंत्र संगणक प्रणालीसह सुसज्ज आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी आणि वित्तीय संस्थांना जलद कारवाई करता येणार आहे.

सायबर सुरक्षेत लक्षणीय सुधारणा ः मुख्यमंत्री

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा पोलिसांचे तंत्रज्ञान आणि समुदायाच्या सहभागाला पोलिसिंगमध्ये एकत्रित करण्याच्या त्यांच्या सक्रिय दृष्टिकोनाबद्दल प्रशंसा केली. या उपक्रमांमुळे सायबर सुरक्षेत लक्षणीय सुधारणा होईल, सार्वजनिक विश्वास वाढेल आणि कायद्याच्या अंमलबजावणीची एकूण कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

या वेळी पोलीस महासंचालक आलोक कुमार, पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग, उपपोलीस महानिरीक्षक अजय कृष्ण शर्मा, सायबर गुन्हा विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांची उपस्थिती होती.