बालन्यायालयाच्या निवाड्याला सरकारचे गोवा खंडपीठात आव्हान

0
4

2009 साली झालेल्या एका अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणातील एक आरोपी ग्रीष्मा तलवार हिची पणजीतील बालन्यायालयाने निर्दोष सुटका करण्याचा जो निवाडा दिलेला आहे त्या निवाड्याला सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. त्याचबरोबर या खून खटल्यातील अन्य दोघे आरोपी चंद्रकांत तलवार व सायरॉन रॉड्रिग्ज यांना जी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे त्या शिक्षेत वाढ करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही सदर आव्हान याचिकेतून करण्यात आली आहे.

वरील तिन्ही आरोपींनी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला खुल्या विद्यालयाचे परीक्षा केंद्र दाखवण्याचे नाटक करून तिला वास्को येथे नेताना वाटेत तिचा गळा दाबून खून केला होता.

वरील सर्व आरोपींनी 2009 साली तीन दिवसांच्या काळात तीन महिलांना लुटून नंतर त्यांचा खून केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी ग्रीष्मा हिच्याविरुद्ध पुरावे नसल्याने तिची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे.