बालकाच्या खूनप्रकरणी विविध साहित्य जप्त

0
31

कळंगुट पोलिसांनी सिकेरी येथे सूचना सेठ या महिलेने आपल्या चार वर्षाचा मुलाचा खून करण्यासाठी वापरलेले साहित्य काल जप्त केले आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यामध्ये उशी, टॉवेल, चाकू आदी वस्तूंचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
मातेने केलेल्या चार वर्षाच्या खुनाचे प्रकरण देशभर गाजत आहे. या प्रकरणी सूचना सेठ हिला सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चार वर्षांच्या मुलाच्या खून प्रकरणाचे तपासकाम जोरात सुरू आहे. या प्रकरणी अटक केलेल्या सूचना सेठ या महिलेची बांबोळी येथील मानसोपचार आणि मानवी वर्तन इस्पितळात तपासणी करण्यात आली आहे.