तिळारी धरणातून गोव्याला होणारा पाण्याचा पुरवठा बंद झाल्याने बार्देश तालुक्यातील विविध भागांत पाणीटंचाईची तीव समस्या निर्माण झाली आहे. कुडासे दोडामार्ग येथे तिळारी कालवा फुटल्याने गोव्याला होणारा पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे. अस्नोडा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाण्याचा पुरवठा होत नसल्याने बार्देश तालुक्यातील पाणीपठ्ठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. पर्वरी येथील पाणी प्रकल्पालाही पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे. उत्तर गोवा हा तिळारीच्या पाण्यावर अवलंबून आहे. नळ कोरडे पडल्याने पाण्याचे खासगी टँकर सुध्दा अपुरे पडत आहे. त्यामुळे टँकरमधून मिळणाऱ्या पाण्याच्या दरात वाढ झाली आहे.