बारावी परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर होणार

0
12

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या गुरूवारी 27 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता पर्वरी येथे मंडळाच्या परिषदगृहात जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव व्ही. बी. नाईक यांनी काल दिली.
शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 1 मार्च 2025 या काळात राज्यातील 20 केंद्रांतून घेण्यात आली. या परीक्षेला कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक अशा शाखातून 17 हजार 686 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तसेच खासगी व इतर मिळून 811 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. परीक्षेचा निकाल वेबसाईटवर उपलब्ध केला जाणार आहे. मंडळातर्फे 27 मार्च रोजी निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थी निकाल पत्रिका 29 मार्चपासून स्कूल लॉगमधून डाऊनलोड करू शकतात. गतवर्षी 2024 मध्ये बारावीच्या परीक्षेचा निकाल 85 टक्के एवढा लागला होता.