गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवार दि. 6 मे रोजी संध्याकाळी 4.30 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. गुणपत्रिका 8 मे 2023 पासून शाळांमध्ये उपलब्ध असतील. गोवा शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा यंदा दोन सत्रात घेतली होती. पहिली सत्र परीक्षा 10 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2022 दरम्यान घेण्यात आली, तर दुसरी सत्र परीक्षा 15 मार्च ते 31 मार्च 2023 या काळात घेण्यात आली. या दोन्ही परीक्षांचा मिळून एकत्रच निकाल जाहीर केला जाणार आहे. राज्यभरातील 20 केंद्रातून ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक शाळेतून एकूण 19,802 विद्यार्थी बसले होते. तसेच खासगी उमेदवार म्हणून 80, एनएसक्यूएफ उमेदवार म्हणून 1229 आणि आयटीआय उमेदवार म्हणून 44 जण परीक्षेला बसले होते. दरम्यान, परीक्षेचा निकाल मंडळाच्याwww.gbshse.in आणि https://results.gbshegoa.net// या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येईल.