बारावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर

0
21

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवार दि. २१ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल ुुु.सलीहीश.ळपषे या संकेतस्थळावर पाहता येईल.

शिक्षण मंडळाने यावर्षी बारावीची परीक्षा दोन सत्रात घेतली होती. ८ डिसेंबर २०२१ ते ११ जानेवारी २०२२ या काळात पहिली सत्र परीक्षा घेण्यात आली, तर ५ एप्रिल ते २३ एप्रिल २०२२ या काळात दुसरी सत्र परीक्षा घेण्यात आली. एकूण १८ हजार २०१ मुले-मुली या परीक्षेला बसली होती. त्यात ८९२५ मुले आणि ९२७६ मुलींचा समावेश आहे. वाणिज्य शाखेत ५४९४ विद्यार्थी, विज्ञान शाखेत ५०७७, कला शाखेत ४७५४ आणि व्यावसायिक शाखेतून २८७४ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. एकत्रित निकालपत्रक २४ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून डाऊनलोडसाठी उपलब्ध असेल.