बायोटेक लशीची तिसरी चाचणी ऑक्टोबरमध्ये

0
254

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारत बायोटेकने विकसित केलेल्या स्वदेशी ‘कोव्हॅक्सीन’ लशीची तिसर्‍या फेजची चाचणी ऑक्टोबर महिन्यापासून लखनऊ आणि गोरखपूरमध्ये सुरु होणार असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने काल जाहीर केले.

ऑक्टोबर महिन्यापासून लखनऊ, गोरखपूरमध्ये भारत बायोटेकने विकसित केलेल्या ‘कोव्हॅक्सी’न लशीची तिसर्‍या फेजची चाचणी सुरु होईल अशी माहिती उत्तर प्रदेशचे प्रधान आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारत बायोटेकने इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्चसोबत मिळून कोव्हॅक्सीन लशीची निर्मिती केली आहे.